NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / सांगलीच्या गुलाबाचा देशात डंका! 2 एकरातून करतोय लाखोंची कमाई, पाहा PHOTO

सांगलीच्या गुलाबाचा देशात डंका! 2 एकरातून करतोय लाखोंची कमाई, पाहा PHOTO

'फुलांच्या राजा'ला अच्छे दिन, Valentine Week मध्ये सांगलीच्या गुलाबाची चर्चा; पाहा काय आहे खास

110

व्हॅलेंटाइन डे असो किंवा लग्न समारंभ किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाला विशेष महत्त्व आहे. त्यात प्रेम व्यक्त करण्यासाठी तर लाल गुलाबाला विशेष महत्त्व आहे.

210

लग्नसराईत गुलाबाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तुम्ही गुलाबाची शेती करुन त्यामधून लाखो रुपयांची कमाई करू शकता.

310

सांगली इथे एका व्यक्तीनं गुलाबाची शेती करुन लाखोंची उलाढाल केली आहे. त्यात व्हॅलेंटाइन डेला या गुलाबांना अच्छे दिन आल्याचं पाहायला मिळालं आहे.

410

सांगली जिल्ह्यातील सोनी पाटगाव भागातील वातावरण गुलाबाला पोषक आहे. त्यामुळे हीच मेख ओळखून त्यांनी गुलाबाची शेती करण्याचा निर्णय घेतला.

510

शेतकरी नंदकुमार माळी यांनी दोन एकरात गुलाबाची बाग फुलवण्याचा निर्णय घेतला. साधारण या गुलाबाचं पिक 5 ते 6 महिन्यांमध्ये येतं. ही गुलाबं तयार झाली की ती कटिंग करुन मिरज तालुक्यातील मार्केटमध्ये पोहोचवली जातात.

610

मिरजमधून नंतर ही गुलाबं पुणे आणि मुंबईसह गोवा, कर्नाटक आणि दिल्लीपर्यंचा प्रवास करतात असं माळी यांनी सांगितलं.

710

नंदकुमार माळी यांचं प्रत्येक महिन्याला एकरामागे सरासरी 50 हजार रुपयांचे उत्पादन होतं. लग्नसराई, व्हॅलेंटाइन डे या कालावधीमध्ये गुलाबाला चांगली मागणी असते. त्यामुळे नफाही चांगला होतो.

810

गुलाबांवर कीड लागू नये किंवा इतर रोग येऊ नयेत म्हणून त्यांना आठवड्यात दोन वेळा फवारणी करावी लागते.

910

घाऊक बाजारात तीन ते आठ रुपये प्रतीफुल असा या गुलाबाचा दर आहे.

1010

कोरोनामुळे गुलाब उत्पादकांना मोठा फटका बसला होता. मात्र यावर्षी सणसमारंभ, व्हॅलेंटाइन डे आणि लग्नसराईत पुन्हा एकदा गुलाबाला आणि शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.

  • FIRST PUBLISHED :