मिरजेतील मिरासाहेब दर्गा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला जातो. हजरत ख्वॉजा शमनामिरा यांच्या 648 व्या उरूसाला प्रारंभ झाला आहे.
हजरत ख्वॉजा शमनामिरा यांच्या उरुसातील पहिल्या दिवशीच्या गलेफचा मान हिंदू चर्मकार समाजाला असतो.
मिरजेतील सातपुते वाड्यातून मानाचा गलेफ अर्पण करण्यात आला.
गलेख मिरवणुकीत चर्मकार समाजातील मान्यवर आणि भाविक सहभागी झाले होते.
सवाद्य मिरवणुकीने नगारखाना येथून गलेफ दर्गाजवळ आला. तेव्हा भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
दर्ग्याजवळ बेंडबत्तासे, खेळणी, खाद्य पदार्थ, महिलांसाठी ज्वेलरीची दुकाने मोठ्या प्रमाणात लागली आहेत.
मिरजेचा ऊरूस देशभरात प्रसिध्द आहे. उरूसासाठी देशभरातून हिंदू - मुस्लिम बांधव येत असतात.
ऊरूस कालावधीत चिंचेच्या झाडाखाली संगीतरत्न खाँ साहेब अब्दुल करीम खाँ यांच्या ८९ वा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होत आहे.
हजरत ख्वॉजा शमनामिरा यांच्या ६४८ उरुसानिमित्त भाविकांना मोफत नाष्टा वाटप करण्यात आला.