NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / 10 लाखांचं घड्याळ, मुंबईत 5 प्रॉपर्टी...; समीर वानखेडेंची महिन्याची सॅलरी किती?

10 लाखांचं घड्याळ, मुंबईत 5 प्रॉपर्टी...; समीर वानखेडेंची महिन्याची सॅलरी किती?

समीर वानखेडेंनी 2018 मध्ये 17.40 लाख रुपयांची एक रोलेक्सचं घड्याळ खरेदी केलं होतं.

19

मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टीदरम्यान आर्यन खानला अटक करणारे समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. सीबीआईने आपल्या चार्टशीटमध्ये आरोप केला आहे की, वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर 2021 मध्ये आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात अडकण्यापासून वाचवण्यासाठी अभिनेता शाहरूख खानकडून 25 कोटींची लाच मागितली होती. शेवटी ही डिल 18 कोटींना नक्की करण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

29

त्यावेळी वानखेडे मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे (NCB) झोनल डायरेक्टर होते.

39

SIT ने केलेल्या तपासानुसार, वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी मालदीव या टूरसाठी तब्बल साडे 5 लाख खर्च केले होते.

49

एसआयटीच्या तपासानुसार, समीर वानखेडेने 2018 मध्ये 17.40 लाख रुपयांचं एक रोलेक्सचं घड्याळ खरेदी केलं होतं. वानखेडेंनी दावा केला आहे की, त्यांना हे घड्याळ पत्नी क्रांतीने गिफ्ट केलं होतं.

59

मात्र ज्यावेळी एसआयटीने क्रांतीचे तीन वर्षांचे आयकर रिटर्न तपासले त्यादरम्यान त्यांचं उत्पन्न 21 लाख रुपये होतं.

69

वानखेडेंनी काही कारणास्तव त्यांच्याकडील चार महागडी घड्याळं कमी किमतीत विकली होती. कर्टियर या घडाळ्याची मूळ किंमत 10.60 लाख असून 6.40 लाखात विकण्यात आलं होतं.

79

महत्त्वाचं म्हणजे वानखेडे यांच्या मुंबईत 5 प्रॉपर्टी असून यातील काही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरही आहे. यामध्ये त्यांच्या नावाचा एक बारही आहे.

89

द प्रिंटमधील माहितीनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे (NCB) झोनल डायरेक्टर म्हणून त्यांचा महिन्याचा पगार 1 ते दीड लाखांच्या जवळपास आहे.

99

त्यामुळे या पगारात समीर वानखेडे यांना इतकी संपत्ती आणि आंतरराष्ट्रीय दौरे करणं कसं शक्य झालं, यावर चर्चा केली जात आहे.

  • FIRST PUBLISHED :