आसिफ मुरसल, सांगली : कधी काय होईल याचा नेमक कुणीच लावू शकत नाही. काळ कधी कसा कुठे तुमच्यावर झडप घालेलं सांगता येत नाही. कार चालकाला अचानक डुलकी लागली आणि भयंकर प्रकार घडला.
बस आणि कारची भीषण धडक झाली. चालकाला डुलकी लागल्या हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
विटा नेवरी रोडवर सकाळी ट्रॅव्हल्स आणि कारचा अपघात झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला. यात तीन पुरुष व एक महिला ठार झाले आहेत.
विट्याहून नेवरीकडे निघालेल्या गितांजली ट्रॅव्हल्सला कारची धडक झाली. अपघात पाहण्यासाठी याठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
मुंबईहून विट्याकडे जाणाऱ्या कारने ट्रॅव्हल्सला धडक दिल्याचे सांगितले जात आहे.
कार चालकाला झोप आल्यामुळे हा अपघात झाल्याचे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले.