सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना राखी बांधून राखीपौर्णिमेचा दिवस साजरा केला. तसं या भाऊ-बहिणीचे अनेक किस्से नेहमी चर्चेत असतात. सुप्रिया सुळेंनी या खास क्षणांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
NCP च्या नेत्या रुपाली चाकणकर यांनीही भावांना राखी बांधून राखीपौर्णिमेला दिवस साजरा केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही काही मुलींनी राखी बांधली. त्यांनीही राखी बांधून घेतली.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आपल्या घरी राखीपौर्णिमेचा दिवस साजरा केला, आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतली.
भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्या घरातील राखीपौर्णिमेचा काही क्षणचित्रं...
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना भगिनी चित्रा कोरटकर, चेतना मोटे, सुजाता बागल, माधुरी माने, मौसमी कोरटकर या भगिनींनी औंक्षण करून राख्या बांधल्या व निरोगी असे उत्तम दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोकामना व्यक्त केली.