NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / ...आणि राज ठाकरे झाले 'माननीय मुख्यमंत्री', वर्षा बंगल्यावरचे खास PHOTOS

...आणि राज ठाकरे झाले 'माननीय मुख्यमंत्री', वर्षा बंगल्यावरचे खास PHOTOS

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली.

17

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं विश्वास नेहमी मनसेसैनिक बोलून दाखवत असतात. खुद्द राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही अशी इच्छा बोलून दाखवली. पण, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्यावेळी राज ठाकरे हे त्यांच्या शेजारी बसले होते.

27

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली आहे.

37

यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत नुकसानग्रस्त शेतकरी देखील होते. तसंच मनसेचे नेते आणि मुलगा अमित ठाकरे सुद्धा हजर होता.

47

जेव्हा राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदे यांच्या शेजारी बसले होते, तेव्हा मा.मुख्यमंत्री ही नावाची प्लेट चुकून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्यभागी आली.

57

त्यामुळे जेव्हा फोटो काढले गेले तेव्हा राज ठाकरे हे मा.मुख्यमंत्री यांच्या जागेवर बसल्याचे दिसून आलं.

67

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

77

गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, मात्र अद्यापही अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

  • FIRST PUBLISHED :