डोक्यावर पाऊस आणि अनेक अडचणी तरीसुद्धा अविरतपणे NDRF चे जवान कामाला लागले आहेत.
इर्शाळवाडी इथे दरड बुधवारी रात्री उशिरा दरड कोसळली होती. त्यानंतर बुधवारी पहाटेपासून इथे NDRF ची टीम बचावकार्य करत आहे.
आज बचावकार्याचा दुसरा दिवस आहे. साधारण 60 एक जण अडकल्याचं सांगितलं जात होतं.
आता NDRF चे जवान अक्षरश: हाताने, फावड्याने ढिगारा बाजूला करुन शोध घेत आहेत.
तिथली परिस्थिती अत्यंत भीषण आहे. लोकांचा आक्रोश आहे. कुणीचे आई वडील तर कुणाचे सासू सासरे तर कुणी मुलं तर कुणीच्या नंडा भावजया या दुर्घटनेत गेल्यानं ग्रामस्थांचा मोठा आक्रोश तिथे पाहायला मिळत आहे.
काल संध्याकाळपर्यंत 16 मृतदेह सापडले होते. आता आज पुन्हा बचावकार्य सुरू आहे.