प्रमोद पाटील प्रतिनिधी पेण : खोपोली मार्गावरुन जाणाऱ्या एका कुटुंबासाठी ती रात्र काळरात्र ठरली. गाडीचं अपघात झाला असून चालकासह चार जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे फोटो पाहून अपघात किती भयंकर झाला असेल याची कल्पना येऊ शकते. पेण खोपोली मार्गावर रात्रीच्या वेळी इर्टिगा गाडीला अपघात झाला. यात चार जण गंभीर जखमी झाले.
रात्री १२ च्या सुमारास पेणहुन खोपोलीच्या दिशेने जात असतात चालकाला डुलकी लागली. कार थेट एका नदीत कोसळली.
कारचेही मोठे नुकसान झालं. एका डुलकीने चार जणांचा घात केला.
चालक ,प्रदीप जाधव, प्रवाशी, मारुती जाधव, सुषमा जाधव, सानिका शिंदे 16 वर्ष जखमींची नाव आहेत.