नाशिकच्या रसिका आडगावकर आणि आसिफ खान यांच्या प्रेम विवाह त्यांच्या भिन्न धर्मामुळे चांगलाच विरोध झाला होता.
त्यांचं लग्न हा लव्ह जिहादचा भाग असल्याचा आरोप काही जणांनी केला होता. तो या दोघांनी फोल ठरवला आहे.
रसिका आणि आसिफ यांची कॉलेजमध्ये ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आमचं निस्वार्थ प्रेम पाहून घरच्यांनी आमचं लग्न लावून देण्याचं ठरवलं, असं असिफ खान सांगतो.
रसिका आणि आसिफ यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतरही ते लग्नावर ठाम होते
आसिफ आणि रसिकाच्या लग्नाला आता जवळपास दीड वर्ष झाली असून त्यांचा संसार सुरळीत सुरू आहे.
परस्परावर विश्वास आणि प्रेम असेल तर सर्व विरोध दूर करून आनंदानं जगता येतं हे आसिफ आणि रसिकानं दाखवून दिलंय.