NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / कुठे द्राक्षाच्या मळ्यात तर कुठे चुलीवरची झणझणीत मिसळ, ही आहे नाशिकमधील टॉप 6 ठिकाणं

कुठे द्राक्षाच्या मळ्यात तर कुठे चुलीवरची झणझणीत मिसळ, ही आहे नाशिकमधील टॉप 6 ठिकाणं

Best Misal in Nashik : नाशिक शहरातील मिसळ संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहेत. नाशिकमध्ये गेल्यानंतर तुम्ही या मिसळीचा आस्वाद नक्की घ्यायला हवा

  • -MIN READ

    Last Updated: April 28, 2023, 13:39 IST
17

खवय्यांचं माहेरघर म्हणून नाशिक शहर प्रसिद्ध आहे. येथील मिसळ जगभर प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये आल्यावर अनेकजण मिसळ नक्की खातात. नाशिक शहरातील सर्वात फेमस मिसळ कोणत्या आहेत ते पाहूया

27

ग्रेप एम्बसी मिसळ : निसर्गरम्य वातावरणात द्राक्ष बागेत या मिसळचा आस्वाद तुम्हाला घेता येतो. त्यामुळे खवय्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजेरी लावतात. कुठे खाणार? - सुयोजित पुलाजवळ, गंगापूर, रोड, मखमलाबाद, नाशिक

37

साधना मिसळ : अस्सल चुलीवरची झणझणीत लाल काळया रस्साची ही मिसळ आहे. येथील जम्बो मिसळ खाण्यासाठी नेहमी गर्दी असते. कुठे खाणार? : हरदेव बाग, गंगापूर - सातपूर लिंक रोड, सोमेश्वर जवळ, बारदान फाटा, नाशिक

47

सिताबाईची मिसळ : या मिसळीला 100 वर्षांची परंपरा आहे. चुलीवरची झणझणीत मिसळीसोबत मिळणारा लाल रस्सा येथील आकर्षण आहे. कुठे खाणार ? वृंदावन कॉलनी, नाईकवाडी पुरा, कोकणीपुरा, नाशिक, 422001

57

श्री सोमनाथ मिसळ : येथील मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं घरगुती मसाले वापरले जातात. ही झणझणीत जम्बो मिसळ खाण्यासाठी इथं नेहमी गर्दी असते. कुठे खाणार? : दुकान क्रमांक 1, महामार्ग बस स्टॉप, मुंबई नाका, नाशिक - 422001 (मायलन सर्कल जवळ)

67

हॉटेल रिलॅक्स कॉर्नर : भिमाबाईंची ही फेमस मिसळ आहे.विशेष म्हणजे इथे मिसळचा आस्वाद घेताना पुस्तकांची देखील मेजवानी मिळते. विविध प्रकारची पुस्तक या ठिकाणी मिसळीचा आस्वाद घेताना वाचायला मिळतात. कुठे खाणार? : नाशिक शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर हॉटेल रिलॅक्स कॉर्नर आहे

77

पेरुची बाग मिसळ : निसर्गरम्य वातावरणात पेरूच्या बागेत तुम्हाला मिसळचा आस्वाद घ्यायला मिळतो. ही मिसळ खाणारा व्यक्ती इथं पुन्हा एकदा नक्की येतो. कुठे खाणार ? मुंगसरे फाटा मखमलाबाद गिरनारे, महामार्ग, नाशिक

  • FIRST PUBLISHED :