NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / शिर्डीच्या साईमंदिरात सुट्ट्या नाण्यांचा झाला मोठा घोळ, बँकाची डोकेदुखी वाढली PHOTOS

शिर्डीच्या साईमंदिरात सुट्ट्या नाण्यांचा झाला मोठा घोळ, बँकाची डोकेदुखी वाढली PHOTOS

शिर्डीतील साईबाबांना दानात आलेली नाणी बँका आणि साईमंदीर प्रशासनाला डोकेदुखी ठरताना दिसत आहेत.(हरिष दिमोटे)

15

शिर्डीतील साईबाबांना दानात आलेली नाणी बँका आणि साईमंदीर प्रशासनाला डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. कोट्यावधी रूपयांची नाणी बँकामध्ये पडून असून आता मंदिरात आलेली नाणी घेण्यास काही बँकांनी असमर्थता दर्शवली आहे.

25

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांना भाविक यथाशक्ती दान देत असतात यात सोने, चांदी तसेच रोख रकमेचे दानही प्राप्त होते. मात्र आता हेच दान संस्थान आणि शिर्डीतील बँकाची डोकेदुखी ठरत आहे. वर्षाकाठी संस्थानला साडेतीन कोटी रुपयांचे सुट्टे नाणे प्राप्त झाले आहेत. यामुळे ही नाणी स्विकारण्यास बँका असमर्थतता दर्शवत आहेत.

35

साईबाबांच्या दानपेटीत दर आठवठ्याला सरासरी 7 लाख तर वर्षाला साडेतीन कोटी रुपयांची नाणी जमा होतात. मात्र आता नाणी स्विकारणे बॅंकांना अवघड होऊन बसल आहे. शिर्डीतील 12 हून अधिक तर नाशिकच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत साईसंस्थाचे खाते आहे.

45

प्रत्येक बँकेकडे दीड ते दोन कोटींची नाणी आजमितीला पडलेली असून नाण्यांच्या डोकेदुखीने चार बँकांनी यापुढे संस्थानच्या ठेवी स्वीकारण्यास असमर्थता दाखवली आहे.

55

दानपेटीत येणाऱ्या नाण्यांमुळे साई संस्थानपुढे तसेच बँकापुढे देखील मोठा प्रश्न निर्माण झालाय...शिर्डी शहरा व्यतिरिक्त जिल्हयातील तसेच परजिल्हयातील राष्ट्रीयकृत बँकामध्ये खाते उडण्याचा संस्थानचा विचार आहे तर संस्थान यातून मार्ग निघावा यासाठी थेट भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करणार आहे.

  • FIRST PUBLISHED :