नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर ऑक्सिजन पार्लर उभारण्यात आलं आहे. एखाद्या रेल्वे स्टेशनवरील हा पहिलाच प्रयोग आहे.
नाशिककरांमध्ये या ऑक्सिजन पार्लरबाबत मोठी उत्सुकता आहे.
24 तास सुरू असणाऱ्या ऑक्सिजन पार्लरमध्ये स्नेक,प्लांट आरेलिया, बुश, ड्रॅगन बांबू,चायनीज बांबू, मनीप्लांट, झामिया, झेड प्लांट, बोनझा, यासह एकूण 18 प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत.
ही सर्व झाडं प्रदूषण दूर करून ऑक्सिजन जास्तीत जास्त तयार करण्याचं काम करत असतात.
नासाच्या अभ्यासात देखील या झाडांचं महत्त्व सांगितलं आहे.
रेल्वे स्टेशन म्हटलं की सहाजिकच या ठिकाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात असतो. प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. स्वच्छ हवा आणि स्वच्छ ऑक्सिजन मिळणे या ठिकाणी अवघड असतं.
नीम फ्रिज पॉलिसी अंतर्गत रेल्वे प्रशासनानं हा उपक्रम सुरू केला असून झाडांची विक्री करून प्रशासनला नफाही मिळत आहे.