राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असला तरी विदर्भात मात्र घामाच्या धार आणि उकाड्याने हैराण होणार आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांसाठी हवामान विभागाने मोठा अलर्ट दिला आहे.
विदर्भात दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्याने उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आवश्यक असेल तर छत्री किंवा स्कार्फ घेऊन बाहेर पडावं.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून विदर्भात उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहेत. शुक्रवारी नागपूरचे कमाल तापमान अर्ध्या अंशाने वाढून ४३ अंशांवर स्थिरावले आहे.
पुढील दोन दिवस अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असल्यामुळे तीव्र चटके बसण्याची शक्यता