NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Nagpur News: पुसदच्या अभिषेकची कमाल, चक्क एका तिळावर रेखाटले शिवराय, पाहा Photos

Nagpur News: पुसदच्या अभिषेकची कमाल, चक्क एका तिळावर रेखाटले शिवराय, पाहा Photos

यवतमाळमधील तरुणाने एक तिळाच्या दाण्याचे 100 तुकडे केले, तर एका तिळावर शिवराय रेखाटले आहेत. अभिषेक रुद्रवारच्या मायक्रो कलाकृतीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.

  • -MIN READ

    Last Updated: April 05, 2023, 12:43 IST
110

एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. परंतु, एका तिळाचे 100 भाग केले असं म्हटलं तर आपला विश्वास बसणार नाही.

210

यवतमाळमधील तरुणाने ही किमया करून दाखवली आहे. एका तिळाचे 100 तुकडे केल्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली आहे.

310

पुसद येथील रहिवासी असणारा अभिषेक रुद्रवार हा सूक्ष्म कलाकृती तयार करतो. त्याने आजवर अनेक लहान कलाकृती तयार केल्या आहेत.

410

गेल्या 4 वर्षांपासून अभिषेक ही कला जोपासत असून 1 हजारहून अधिक कलाकृती तयार केल्याचे त्याने सांगतिले.

510

अभिषेक आपल्या या अनोख्या कलेचे इतरांनाही प्रशिक्षण देत आहे. तसेच विविध ठिकाणी प्रदर्शनही भरवले आहे. मात्र, त्याला अद्याप मोठे व्यासपीठ मिळाले नाही, अशी खंत तो व्यक्त करतो.

610

एका तिळाच्या दाण्यावर त्याने छत्रपती शिवाजी महाराज रेखाटले आहेत. तर मोहरीवर गणपती, तांदळाच्या दाण्यावर A ते Z अक्षरे लिहली आहेत.

710

जगातील सर्वात सुक्ष्म तिरंगा, पेन्सिलच्या टोकावर अष्टविनायक, शिवाजी महाराज, तुळजाभवानी यांची मूर्ती कोरली आहे.

810

सुपारीवर भवानी देवी, रेणुका देवी, शिवलिंग रेखाटले आहे. तर 3 मिमी पेन्सिलच्या लीडवर नाव कोरले आहे.

910

अभिषेकने तयार केलेले अक्षर गणेश, सर्वात सूक्ष्म निसर्ग चित्र, गवताच्या एका पानावर गणपती, तांदळाच्या दाण्यावर गणपती ही आकर्षक आहेत.

1010

ही कला खर्चिक नसली तरी मनाची आणि एकाग्रतेचा सचोटी बघणारी आहे. अनेकांनी या कलेचे कौतुक केले आहे.

  • FIRST PUBLISHED :