NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Nagpur News: रमजानसाठी नागपूरमध्ये काय कराल खरेदी? पाहा Photos

Nagpur News: रमजानसाठी नागपूरमध्ये काय कराल खरेदी? पाहा Photos

मुस्लिम बांधवांमध्ये या पवित्र महिन्यात मोठा उत्साह बघायला मिळतो. तसेच शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये  चैतन्य बघायला मिळते.

  • -MIN READ

    Last Updated: April 21, 2023, 15:31 IST
112

मुस्लिम बांधवांसाठी रमजान हा महिना अतिशय पवित्र मानला जातो. रमजान मध्ये केलेल्या उपासनेचे फळ इतर महिन्यांच्या तुलनेत कैक पटीने जास्त असते, असे म्हटले जाते.

212

रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर काहीही न खातापिता कडक रोजे म्हणजेच उपवास करतात. तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर रोजे सोडतात, ज्याला इफ्तार असे म्हटले जाते.

312

रमजान हा खूप भरभराटी व बरकतीचा महिना मानला जातो. मुस्लिम बांधवांमध्ये या पवित्र महिन्यात मोठा उत्साह बघायला मिळतो.

412

रमजानच्या काळात शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये चैतन्य बघायला मिळते. बाजारपेठा विविध वस्तू, फळांनी फुललेल्या असतात.

512

नागपुरातील मोमीनपुरा भागातील बाजारपेठ सध्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गजबजलेली आहे. बाजारात खेरदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी झाल्याचे चित्र आहे.

612

मुस्लिम समाजात पुरुषांनी टोपी घालणे सुन्नत समजली जाते. टोपी शिवाय पेहराव अपुरा असतो. ईद निमित्त मोमिनपुऱ्यातील बाजारात आकर्षक रंगबिरंगी टोप्या दाखल झाल्या आहे.

712

रमजानमध्ये अत्तर, सुरमा अरबी, रुमाल, साफा, शॉल, तसबी कुरान शरीफ, काबा मदिनाचे शोपीस याची मागणी ही वाढत आहे.

812

या दिवसात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण नवीन कपडे परिधान करत असतात. त्यामुळे बाजारात नवीन कपडे, टोपी, पठाणी ड्रेससोबतच रेडिमेड कपडे, लहान मुलांचे कपडे यांना जास्त मागणी आहे.

912

मुस्लिम बांधवांमध्ये या दिवसात काही विशेष खाद्य पदार्थांची मेजवानी असते. शिरखुर्मा या गोड पदार्थावर रोजाचा समारोप केला जातो.

1012

शिरखुर्मासाठी लागणारे शेवाई, सुखा मेवा इत्यादी पदार्थ तसेच अन्य खजूर, फळ, मिठाई, शेवळ्या, केक इत्यादी प्रकारच्या खाद्य पदार्थांच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहे.

1112

मुस्लिम बांधवांना सुगंधी अत्तर, परफ्यूम इत्यादीचा विशेष आकर्षण असून सध्या सुगंधी अत्तरांची दुकाने बाजारात सज्ज झाली आहेत.

1212

शहरातील मोमिनपुरा भागातील मस्जिदीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

  • FIRST PUBLISHED :