बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्याच्या पिंपळखुटा गावानजीक झालेल्या भीषण अपघातात वृषाली वनकर, शोभा वनकर आणि ओव्ही वनकर या तिघांचाही मृत्यू झाला आहे.
सुमारे दोन वर्ष वयोगटातील ओव्ही हिला वृषाली आणि वृषालीच्या पतीने काही महिन्यांपूर्वी दत्तक घेतले होते.
वृषालीचा परिवार सुखी संसाराचं स्वप्न बघत असतांना इवलेसे बाळ आजीच्या खांद्यावर, मांडीवर बागडायला लागली होती.