यंदा उन्हाळ्यात अवकाळी पावसानं खो घातला त्यानंतर मोचा चक्रीवादळ आणि आता मान्सून लांबणीवर. या सगळ्याचा परिणाम पिकांवर झाला आहे. यंदाचा उकाडा अधिक लांबणार आहे. मान्सून उशिरा येणार आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात पारा 45 पर्यंत पोहोचत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उष्णता वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकरीच नाही तर सगळेच मान्सूनच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत.
यावेळी मान्सून उशिरा येण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेल्या दोन वर्षांतही मान्सून उशिराच आला होता. त्यामुळे बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे. मान्सून वेळेत आला नाही तर पेरणी कशी करायची हा प्रश्न आहे.
उत्तर तेलंगणात अधूनमधून मान्सूनपूर्व सरी 19 जूनपूर्वी येऊ शकतात. 19 ते 24 जून दरम्यान कोरड्या पावसाची उच्च संभाव्यता आहे. 24 जूनपासून मान्सूनचा पाऊस अपेक्षित आहे.
महाराष्ट्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनच्या पावसाला व्यवस्थित सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे. जूनमध्ये मान्सूनपूर्व पाऊस येईल असा अंदाज आहे.
दिल्ली-एनसीआर भागात जूनच्या अखेरीस मान्सूनपूर्व पाऊस पडू शकतो. 12 जुलैनंतर मान्सूनच्या पावसाची सुरुवात होईल असा अंदाज आहे. 27 जुलैपासून मान्सूनचा पाऊस येईल अशी अपेक्षा आहे.
मोका चक्रीवादळाचा अरबी समुद्रावर कोणताही परिणाम होणार नाही. वेदर ऑफ वेदरिज या लोकप्रिय खाजगी हवामान ब्लॉगचे राजेश कपाडिया यांनी सांगितले की, अरबी समुद्रात काही दिवस उशीर होण्याची शक्यता आहे.