अजित मांढरे, प्रतिनिधी मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस गेल्या काही तासांपासून सुरू आहे. पावसामुळे नदी नाले दुधडी भरुन वाहात आहेत. नद्यांनी रौद्र रुप धारण केलं आहे.
जगबुडी, पंचगंगेपाठोपाठ आता सावित्री नदीनंही रौद्र रुप धारण केलं आहे.
सावित्री नदीचे पाणी महाड शहारत अनेक इमारती आणि हॅाटेलमध्ये शिरलं आहे.
पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे तर दुसरीकडे शहरात पाणी शिरल्याने घर आणि सामानाचं नुकसान झालं आहे.
पावसामुळे दाणादाण उडाली असून गावं आणि शहरांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.