कोरोनाच्या काळात कशी दिवाळी साजरी करावी याबाबत राज्य सरकारनं नियमावली जाहीर केली आहे. सगळ्यांनी त्याचं पालन करावं असं आवाहनही सरकारने केलं आहे.
दिवाळीच्या 5 मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने गृह विभागाने जारी केल्या आहेत. यानुसार दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.
तसेच, यंदा दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा.
धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा. असेही सरकारच्या वतीनं सांगण्यात आले आहेत.