उद्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं मतदान होणार आहे. उद्याचा दिवस सर्व पक्षांसाठी फार महत्त्वपूर्ण असणार आहे. सर्व पक्षांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. यातही आज आम्ही तुम्हाला भाजपचे उमेदवार पराग शाह यांच्या संपत्ती आणि साम्राज्याबद्दल सांगणार आहोत..
मुंबईतील घाटकोपर पूर्वकडून पराग शहा भाजपकडून ही निवडणूक लढवत आहेत. त्यांचा स्थावर मालमत्तेचा व्यवसाय असून त्यांची एकूण संपत्ती 500 कोटी रुपयांच्या आसपास आहे. तर जंगम मालमत्ता 422 कोटी रुपये आहे.
पराग यांचा व्यवसाय गुजरात आणि तमिळनाडूमध्ये पसरलेला असून गुजराती आणि जैन समुदायात ते अधिक प्रसिद्ध आहेत.
2017 मध्ये पराग यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली. ही निवडणूक जिंकून ते नगरसेवक झाले. त्या दरम्यान त्यांची संपत्ती ही 690 कोटी रुपये सांगण्यात आली होती.
कोट्यधीश पराग शाह आणि त्यांची पत्नी यांच्याकडे 299 कोटी रुपयांचे शेअरही आहेत.
त्यांच्या पत्नीच्या नावाने असलेल्या संपत्तीत व्यावसायिक, निवासी, शेती आणि बिगर शेती जमिनी आहेत.
वाहनांमध्ये पराग शहा यांच्याकडे अनेक नावाजलेल्या ब्रॅण्डचा गाड्या आहेत. यात स्कोडा रॅपिडपासून ते फरारीपर्यंतच्या गाड्यांचा समावेश आहे.