NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / World Sparrow Day : वर्दीतील फोटोग्राफरची कमाल! टिपले निसर्गाचे सुंदर Photos

World Sparrow Day : वर्दीतील फोटोग्राफरची कमाल! टिपले निसर्गाचे सुंदर Photos

लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फिंगरप्रिंट डिपार्टमेंटला काम करणारे धनंजय गुट्टे यांना वाइल्ड लाईफ फोटोग्राफी यासाठी चार राज्यस्तरीय व दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

  • -MIN READ

    Last Updated: March 20, 2023, 14:22 IST
116

आज 20 मार्च हा 'जागतिक चिमणी दिवस' (world sparrow day) म्हणून जगभरात साजरा केला जातो.

216

चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा दिवस म्हणून पहिला जागतिक चिमणी दिन 2010 मध्ये साजरा करण्यात आला.

316

मानवाप्रमाणेच सर्व पशु-पक्षीही निसर्गाचा भाग आहेत. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे अनेकदा पशु-पक्षी संकटात येतात.

416

लातूरमध्ये मानवाच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी काम करणारा पोलीस कर्मचारी पशु-पक्षांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठीही कार्यरत आहे.

516

पोलीस अधीक्षक कार्यालयात फिंगरप्रिंट डिपापर्टमेंटला काम करणारे धनंजय गुट्टे यांना वाइल्ड लाईफ फोटोग्राफीचा छंद आहे.

616

आपल्या कॅमेरातून ते निसर्गातील सौंदर्य टिपत असतात. पशु-पक्षांच्या विविध भावमुद्रा ते कॅमेराबद्ध करतात.

716

निसर्गातील झाडे, वेली, वन्यप्राणी, पक्षी यांचे सुंदर क्षण धनंजय यांनी कॅमेरात कैद केले आहेत.

816

वाइल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी धनंजय गुट्टे यांना चार राज्यस्तरीय व दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

916

धनंजय हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असाताना पशु-पक्षांवरील डॉक्युमेंटरी करत असत. त्यासाठी त्यांना प्राणी आणि वनस्पतींचे फोटो लागायचे.

1016

धनंजय सुरुवातीला इंटरनेटवरून फोटो घेत होते. परंतु, पुढे त्यांनी स्वत: फोटो घेऊन ते वापरायला सुरुवात केली. यातूनच त्यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा छंद लागला.

1116

पशु-पक्षांच्या संवर्धनासाठी काम करताना आता ते त्यांनी टिपलेले सुंदर फोटो त्यासाठी वापरतात.

1216

वाइल्ड लाईफ फोटोग्राफीतून निसर्गाबद्दल आवड निर्माण झाली. पशु, पक्षी, किटक, वनस्पती यांचा अभ्यास सुरू केल्याचे धनंजय सांगतात.

1316

वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी भटकंती करावी लागते.

1416

वन्यप्राणी, पक्षांसाठी तासनतास एका ठिकाणी थांबून राहावे लागते.

1516

निसर्गात भटकंती करताना आपली ओळख लपून जात असल्यास खूप काही सुंदर गोष्टी पाहायला मिळतात, असे धनंजय सांगतात.

1616

जागतिक चिमणी दिनानिमित्त सर्वांनी दूर्मिळ होत चाललेल्या चिमण्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहनही धनंजय गुट्टे यांनी केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :