कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या रॉयल हॉर्स शोमध्ये रुबाबदार घोड्यांची साहसी प्रात्याक्षिकं पाहायला मिळाली.
कोल्हापूरकर या रॉयल हॉर्स शोची आतुरतेनं वाट पाहात होते.
कोल्हापूर इक्वेस्ट्रियन असोसिएशनच्या मार्फत कोल्हापुरात या शोचं आयोजन करण्यात आलं आहे.
कोल्हापुरातील नवीन राजवाडा अर्थात न्यू पॅलेस परिसरात पोलो मैदानावर या शोचं आयोजन करण्यात आलं आहे.
100 हून अधिक घोडे आणि 250 हून जास्त घोडेस्वार यामध्ये सहभागी झाले आहेत.
या हॉर्स शो मध्ये पुणे, ठाणे, सातारा, अकलूज, कोल्हापूर,पन्हाळा आणि अतिग्रे अशा विविध ठिकाणाहून घोडेस्वार सहभागी झाले आहेत.
20 थरोब्रेड, 40 काठेवाड, 20 मारवाडी असे एकूण 80 घोडे आणि 250 घोडस्वार यामध्ये सहभागी झाले आहेत.
14 वर्षांपर्यंत, 14 ते 18 आणि 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे घोडेस्वार या वयोगटात ही स्पर्धा आहे. तर आजवर कोणतीच स्पर्धा न जिंकलेल्यांचा बिगिनर असा एक वेगळा गट आहे.
खास कोल्हापूरच्या घोडेस्वारांसाठी 14 वर्षांखालील आणि 14 वर्षांवरील असे दोन वेगळे गट देखील आहेत.
शाहू छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे. तर अहमदाबाद गुजरात येथील विशाल बिशनोई आणि जर्मनी वरून आलेले ह्रिदय छेड़ा हे या स्पर्धेतील प्रात्यक्षिकांसाठी परिक्षणाचे काम पाहत आहेत.