कोल्हापूरमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलाला बंपर लॉटरी लागली आहे. ऑनलाईन गेममधून त्याने तब्बल 1 कोटी रुपये कमावले आहेत. मुरुगड इथल्या सक्षम कुंभार याने ही कामगिरी केली आहे.
ऑनलाईन गेममध्ये सक्षम कुंभार निष्णात होता, त्यातून त्याने हे यश मिळवलं आहे. मंगळवारी भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यावर सक्षमने पैसे लावले होते.
सक्षमच्या टीममध्ये इशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली, डेवॉन कॉनवे, शुभमन गिल, ब्रेसवेल, हार्दिक पांड्या, डफी, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर आणि टिकनर यांना टीममध्ये निवडलं.
भारत-न्यूझीलंड सामन्यामध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल आणि डेवॉन कॉनवे यांनी शतकं केली. शार्दुल ठाकूरला उत्कृष्ट ऑलराऊंडर कामगिरीबद्दल मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. हार्दिक पांड्यानेही अर्धशतक करत विकेट घेतल्या.
सक्षम कुंभार याने निवड केलेल्या प्रत्येक खेळाडूनेच धमाकेदार कामगिरी केली, ज्यामुळे त्याच्यावर पैशांचा वर्षाव झाला आहे.
ऑनलाईन गेममधून पैसे मिळाल्यानंतर सक्षम कुंभार याची कोल्हापुरातून मिरवणूकही काढण्यात आली.
सक्षम कुंभार याला 1 कोटी रुपये मिळाले असले तरी टॅक्स कट होऊन त्याच्या खात्यात 70 लाख रुपये जमा झाले आहेत.
ऑनलाईन गेम हे एक व्यसन आहे, यामध्ये पैसे गमावण्याचा धोकाही आहे. न्यूज 18 ऑनलाईन गेम खेळण्यास प्रोत्साहन देत नाही. प्रत्येकाने स्वत:च्या जोखमीवरच ऑनलाईन गेम खेळावेत.