कोल्हापूर, 24 फेब्रुवारी : चामड्यापासून बनवलेली करकर असा आवाज करणारी कोल्हापुरी चप्पल जगभर प्रसिद्ध आहे.
या जागतिक ब्रँडला कोल्हापुरातील व्यावसायिकाने वेगळे रूप दिले आहे. त्यांने चक्क गाईच्या शेणापासून कोल्हापुरी चप्पल बनवली आहे.
कोल्हापूरमधील किरण माळी यांनी ही चप्पल बनवली असून त्याला गोमय पादूका असं नाव दिलं आहे.
गायीच्या शेणापासून आणि गोमूत्र वापरून चप्पल, वेदिक रंग, गोक्रिट (बांधकामासाठी लागणाऱ्या विटा), धूप, शोपिस, वॉलपिस याचा समावेश करून ही चप्पल बनवण्यात आलीय.
गायीच्या शेणापासून गेल्या दोन वर्षांपासून अशा पादुका बनवल्या जात आहेत.
या गोमय पादुका बनवण्यासाठी देशी गाईचे शेण, लाकडाचा भुस्सा, लाकडी मैदा या गोष्टी वापरल्या जातात.
या पादुका थोड्या नाजूक असतात. म्हणजेच या पादुका घराबाहेर न वापरता फक्त घरी किंवा ऑफिस मध्ये वापरासाठी आहेत
या पादुका आपल्या चांगल्या आरोग्यासाठी वापरल्या जाव्यात या उद्देशानेच बनवलेल्या असल्याचे माळी यांनी स्पष्ट केले.