NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / …अन्यथा निरपराध लोकांचे प्राण घेण्यास तुम्हीच जबाबदार असाल, कोल्हापुरातील मैदानाबाबत अभ्यासकांचा इशारा PHOTOS

…अन्यथा निरपराध लोकांचे प्राण घेण्यास तुम्हीच जबाबदार असाल, कोल्हापुरातील मैदानाबाबत अभ्यासकांचा इशारा PHOTOS

या आधी बऱ्याच जणांनी खासबाग मैदानाच्या सुरक्षेचा मुद्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. मात्र आता या घटनेमुळे हा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

  • -MIN READ

    Last Updated: July 28, 2023, 20:25 IST
111

कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह परिसर आणि खासबाग मैदानासाठी असणारी सामाईक भिंत कोसळून एक दुर्घटना नुकतीच घडली होती.

211

यावेळी नाट्यगृहात एका कार्यक्रमासाठी आलेल्या दोन महील्या या भिंतीच्या ढीगाऱ्याखाली अडकल्या होत्या. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली होती.

311

दरम्यान या आधी बऱ्याच जणांनी खासबाग मैदानाच्या सुरक्षेचा मुद्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. मात्र आता या घटनेमुळे हा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

411

इतिहास अभ्यासक राम यादव यांनी यावर भाष्य करत ऐतिहासिक खासबाग मैदानाबाबत खंत व्यक्त केली आहे. प्रशासनाला केव्हा जाग येणार, असा सवालच जणू त्यांनी केला आहे.

511

खासबाग मैदानाची 2012-2013 साली करण्यात आलेली डागडुजी आणि सुशोभिकरण करताना भिंतींना असणारे एअर होल मुजवून त्यात दगड, सिमेंट घालून बंदिस्त करण्यात आले होते. खरंतर हे एअर होल मुजवणेच चुकीचे असल्याचे राम यादव यांचे स्पष्ट मत आहे.

611

या मैदानाच्याच दक्षिण पूर्व भागाकडील भिंत ही नगर विकासासाठी करण्यात आलेल्या भकास कारभारामुळेच पडली आहे, असे यादव म्हणतात.

711

इ. स. 1944 च्या सुमारास नगर सुधारणा योजनेत मैदानाचा दक्षिणेकडील भाग तोडून काढून त्यामागे रस्ता करण्यात आला होता. म्हणजेच तो भाग शाहूकालीन नसून त्यानंतरचा असल्याचे यादव यांनी सांगितले.

811

दरम्यान कोणत्याही ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचे काम खूपच महत्वाची बाब असेल तरच करावे. हे काम खूप विचारपुर्वक आणि अभ्यासाअंती करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

911

तर प्रशासनाने आत्ता तरी जागे होणे गरजेचे असून अन्यथा निरपराध लोकांचे प्राण घेण्यास प्रशासनच कारणीभूत ठरेल, असे शेवटी राम यादव म्हणालेत.

1011

दरम्यान कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी घडलेली दुर्घटना नेमकी कोणकोणत्या कारणांमुळे घडली, हे बांधकाम करताना करण्यात आलेले एअर होल्स सारख्या महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास केला जात असल्याचे सांगितले आहे.

1111

त्याचबरोबर हे ऐतिहासिक बांधकाम पूर्वी ज्या पद्धतीने बांधण्यात आले होते त्या सर्व पद्धतीचा विचार करून या ऐतिहासिक खासबाग मैदान सुरक्षेच्या दृष्टीने दीर्घकालीन उपाययोजना केल्या जातील असे देखील अडसूळ यांनी स्पष्ट केले आहे.

  • FIRST PUBLISHED :