NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Sharad Pawar Birthday : महाराष्ट्रातील शक्तीशाली पवार कुटुंब एकमेकांशी कसं जोडलं गेलंय?

Sharad Pawar Birthday : महाराष्ट्रातील शक्तीशाली पवार कुटुंब एकमेकांशी कसं जोडलं गेलंय?

महाराष्ट्रातील सर्वात शक्तीशाली पवार कुटुंबात आजही सर्वांमध्ये आपुलकी आणि प्रेम पाहायला मिळते. प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात या कुटुंबाची एकता पाहायला मिळते.

17

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे घराणे फार मोठे आहे. त्यांना चार भाऊ आणि एक बहीण आहे. थोरल्या भावाचे नाव अप्पासाहेब, दुसरा क्रमांक अनंतराव. तिसरे शरद पवार आणि चौथा भाऊ प्रताप तर सरोज पाटील असे त्यांच्या बहिणीचे नाव आहे. अनेकदा या कुटुंबात तेढ असल्याच्या वावड्या उठतात. मात्र, अद्याप हे कुटुंब अखंड आहे.

27

अजित पवार हे शरद पवारांचे राजकीय आधारस्तंभ मानले जात होते. त्यांचे थोरले बंधू अनंतराव पवार यांचे ते दुसरे पुत्र. अजित यांचे मोठे भाऊ श्रीनिवास, त्याचा ऑटोमोबाईल आणि इतर गोष्टींचा मोठा व्यवसाय आहे. दोन्ही भावांमध्ये सतत संवाद होत असतो.

37

या फॅमिली ट्रीमधून शरद पवार यांचे घराणे समजू शकते. शरद पवार यांचे आई-वडील ऊस सहकारी संस्थेशी निगडीत होते. वडील गोविंद राव हे बारामती खरेदी सेल्स असोसिएशनमध्ये बराच काळ राहिले. पुढे त्यांनी बारामती परिसरात सहकारी साखर कारखान्यांची स्थापना केली.

47

त्यांचे धाकटे बंधू प्रताप गोविंदराव पवार हे सकाळ या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वृत्तपत्र समूहाचे मालक आहेत. त्यांना पद्मश्रीही मिळाला आहे.

57

पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे खासदार आहेत तर त्यांचे पती सदानंद हे मोठे उद्योगपती आहेत. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत.

67

अजित पवार यांना दोन मुलगे (जय आणि पार्थ) असून तेही शरद पवारांचे नातू आहेत. पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. पार्थ पवार निवडणुकीत पराभूत होणारे कुटुंबातील पहिले सदस्य ठरले.

77

अप्पासाहेब यांचे नातू रोहित हे पवार घराण्याचे वारसदार मानले जातात. ते सध्या कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदार आहे. शरद पवार यांच्या मोठ्या भावाला दोन मुलगे आहेत. राजेंद्र आणि रणजीत. मोठा भाऊ राजेंद्र यांच्या मुलाचे नाव रोहित आहे. तर सर्वात धाकटा भाऊ प्रताप याला अभिजीत नावाचा मुलगा आहे.

  • FIRST PUBLISHED :