मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद हा सण आता काही तासांवर आलाय. सर्वच बाजारपेठेत त्याची लगबग जाणवतीय.
छत्रपती संभाजीनगरनंतर मराठवाडयात जालना शहरात मुस्लिमांची संख्या अधिक आहे.
रमजाननिमित्त जालना शहरात दरवर्षी मीना बाजार भरवण्यात येतो. या बाजारात ईदसाठी विविध वस्तू दाखल झाल्या आहेत.
रमजान महिन्यात मुस्लीम बांधव रोजाचा उपवास करतात. रोजा सोडण्यासाठी विविध खाद्यपदार्थ या बाजारात मिळतात.
मीना बाजारात सुकामेवा खरेदी करण्यासाठीही मोठी गर्दी होते. जालना शहरातून सर्वच भागातील नागरिक इथं खरेदीसाठी येतात.
चप्पल तसंच बूटांच्या विविध प्रकाराची रमजान निमित्त मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
गेल्या अनेक दशकापासून जालना शहरामध्ये रमजान महिन्यात मीना बाजार भरतो. ईदच्या आदल्या दिवशी इंथ मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पदार्थांची विक्री होते.