सध्या ट्रेकिंग करण्याचे फॅड सगळीकडेच आले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत गड किल्ले किंवा उंचावरील ठिकाणी ट्रेकिंगला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
जालना जिल्ह्यातील जाफराबादच्या मयूर बोर्ड यांना देखील ट्रेकिंगची आवड आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर अवघ्या दोनच तासात त्यांनी सर केले आहे.
सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीच्या कळसूबाई शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 1 हजार 646 मीटर इतकी आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात हे शिखर सर करणे अवघड असते.
कळसूबाईचा खडतर प्रवास एकदा तरी पूर्ण करावा अशी इच्छा होती. अखेर प्रचंड पाऊस, दाट धुके व ढंग असताना मी नुकतीच ही मोहीम फत्ते केली. राज्यातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर हे महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहे असं मयूर बोर्डे यांनी सांगितले.

या मोहिमेत त्यांच्यासोबत राहुल भंडारे, अजय केंद्रे, विलास झारखंडे, अनिल झाल्टे जीवन अवचार, रवी मुलचंदाणी, निखिल कबुतरे, सुधीर देशमाने, जय जोशी, स्वप्निल खाडे, अमोल शेळके, माधव जेथे, सुनील रमडवाल, रिकोर्ड पॉवेल हे सहभागी होते.