जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दहीपुरी येथील तानाजी लटके या शेतकऱ्यानं निराश होऊन टोकाचा निर्णय घेतला.
लटके यांनी त्यांच्या दोन एकर टोमॅटोच्या शेतामध्ये चक्क जनावरं सोडली.
तानाजी लटके यांना एकूण 4 एकर जमीन आहे. ऑक्टोबरमध्ये त्यांनी 2 एकर टोमॅटो लागवड केली होती. परंतु गेल्या दोन तीन महिन्यांपासून बाजारात टोमॅटोला अपेक्षित भाव नाही.
शेतातील टोमॅटो औरंगाबाद मार्केटला नेण्यासाठी मजूर महीलांचा कॅरेटसह तोडणी खर्च आणि वाहन भाडेही वसूल होत नव्हते.
तानाजी लटके यांनी वैतागून चक्क कष्टाने पिकविलेले उभे असलेले टोमॅटोचे सर्व पिक समूळ उपटून बांधावर फेकले.
सर्वच भाजीपाल्यांना कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हाताश झाला आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचाही शेतीला मोठा फटका बसला आहे.
लटके यांच्या शेतात सर्वत्र टोमॅटोचा सडा पडलाय. त्यांच्यावर पाणावलेल्या डोळ्याने स्वत:च्या हातांनी पिकाला नष्ट करण्याची वेळ आलीय.