आयकर विभागाने स्टिल कारखानदारांचा बेकादेशीर उद्योग चव्हाट्यावर आणला आहे.
तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता समोर आली आहे. यात 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरेसह 16 कोटींचा ऐवज सापडला आहे. एवढंच नाहीतर 300 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रही सापडली आहे.
मागील 1 ऑगस्टपासून हे धाड सत्र सुरू होते. तब्बल 8 दिवस ही कारवाई चालली. आयकर विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या पथकांमार्फत एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली.
एकूण सुमारे ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. तर औरंगाबादेतही दोन व्यावसायिकांवर छापे टाकण्यात आले. त्यांच्याकडून ५८ कोटी रोख जप्त केली आहे. यात १६ काटींचे सोन्याचे दागिने, हिरे आढळले आहे.
विशेष म्हणजे, जालन्यात येण्याआधी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नामी शक्कल लढवली. आपल्या कारवाईची कुणकुण कुणाला लागू नये म्हणून वऱ्हाडी बनून आले. लग्नासाठी असलेल्या गाड्या बूक करण्यात आल्या होत्या. गाड्यांवर दुल्हन हम ले जायेंगे.
नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबईच्या अधिकाऱ्यांनी आपल्या गाड्यांवर सुद्धा असे स्टिकर लावले होते. एका गाडीवर तर वर आणि वधूचे स्टिकर लावलेले होते. प्रत्येक अधिकाऱ्यांच्या गटाला विशेष असा कोडवर्डही दिला होता. एकूण 260 अधिकारी आणि 120 गाड्यांचा हा ताफा होता.