हिंगोली : गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात नकली नोटा मार्केटमध्ये आणण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगरात कारवाई केली होती. आता हिंगोलीमधून पोलिसांनी लाखो रुपयांच्या नकली नोटांचं घबाड जप्त केलं आहे.
नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा हिंगोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. औंढा नागनाथ पोलिसांनी काल रात्री हि कारवाई केली आहे. पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान औंढा नागनाथ शहरातील सरकारी दवाखाना परिसरात काही जण संशयितरित्या आढळल्याने त्यांची चौकशी केली.
तब्बल एक कोटी 14 लाख रुपये किमतीच्या नकली नोटा आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी औंढा नागनाथ येथून 6 जण व बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून तिघेजण आरोपी ताब्यात घेतले आहेत.
या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल एक कोटी 14 लाख रुपये किमतीच्या नकली चलली नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
यातील आरोपी हे नांदेड, लातूर बुलढाणा जिल्ह्यातील असून नकली नोटा चालवणारे मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
कशी ओळखयची नोट खरी की खोटी- डोळ्यासमोर 45 डिग्रीमध्ये नोट पकडली तर तुम्हाला 500 रुपये लिहिलेलं दिसेल. देवनागरीमध्ये 500 किंवा 2000 रुपये लिहिलेलं असेल. महात्मा गांधी यांचा फोटो एकदम सेंटरमध्ये दिसेल
भारत आणि India लेटर्स लिहिलेले दिसतील. जर तुम्ही ही नोट हलक्या हाताने दुमडली तर सिक्युरिटी थ्रीडीच्या रंगाचा रंग हिरवा ते निळा असा बदलताना दिसेल. वर्नर सिग्नेचर, गॅरेंटी क्लॉज, मिस क्लॉज आणि RBI लोगो उजव्या बाजूला देण्यात आला आहे. ५०० रुपयांच्या नोटेवर रंगही बदलतो