मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यातमध्ये तापमानाने कहर केला आहे. उन्हाचे चटके अधिक तीव्र बसत असून तापमान 40 अंशांच्या वर पोहोचलं आहे.
जळगाव, भुसावळ, अकोला, चंद्रपूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 41 अंशांच्या वर तापमान आहे. मुंबई- ठाण्यातही उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत. ठाण्यात तर 43 अंशांपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील तापमानात सतत वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील तापमान 43 डिग्री सेल्सियसवर पोहोचत आहे. त्यामुळे ठाकणेकरांना उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत.
एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके बसतात तर मे महिन्यात काय होईल या विचारानेच नको वाटत आहे.
दुपारी उन्हाच्या तीव्र झळा आणि रात्री उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अंगाची लाहीलाही होत आहे.
उन्हापासून वाचण्यासाठी लोक छत्र स्कार्फ घेऊन बाहेर पडत आहेत. एवढंच नाही तर आता लिंबू सरबत, छास यासाठी दुकानात लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सोलापूर शहराचा पारा 41.6 अंशांवर गेला. वाढत्या उष्म्याने सोलापूरकर हैराण झाले आहेत.