वर्ग बंदच, पण शाळा सुरू. एका वेळी 50 टक्क्याहून कमी शिक्षकांना शाळेत बोलवायला परवानगी. मोठ्या वर्गातले निम्मे विद्यार्थीही शाळेत राहू शकतील उपस्थित
मेट्रो सेवा महाराष्ट्रात 15 ऑक्टोबरपासून सुरू होईल. पण मुंबई लोकल मात्र सर्वसामान्यांसाठी बंदच राहील.
सोशल डिस्टन्सिंग पाळून आठवडी बाजारही सुरू करायला 15 तारखेपासून परवानगी मिळाली आहे.
ग्रंथालयं सुरू करण्याची मागणी होती. ती मान्य झाल्याने आता लायब्ररी सुरू होईल.
लग्न, सोहळे, समारंभ यासाठी जास्तीत जास्त 50 माणसांच्या उपस्थितीलाच परवानगी आहे. अंत्यसंस्कार फक्त 20 जणांच्या उपस्थितीतच करावेत असा नियम लागू आहे.
थिएटर उघडण्याबाबत अद्याप निर्णय नाही.
मंदिरं आणि प्रार्थनास्थळं अद्याप उघडण्याचानिर्णय नाही.
सोशल डिस्टन्सिंग पाळून दुकानं रात्री 9 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
रेस्टॉरंट्स आणि बार रात्री उशिरापर्यंत उघडी राहण्यास परवानगी