चौथ्या देशव्यापी लॉकडाऊनला आजपासून सुरुवात झाली. पण सलग दोन महिने देश बंद ठेवल्याने नेमका कुणाला आणि किती लाभ झाला त्याचं चित्र पाहा पुढच्या काही ग्राफिक्समध्ये...
कोरोनाव्हायरची सुरुवात झाली, तेव्हा भारताचं चित्र असं होतं. दक्षिणेकडची राज्यांमध्ये सर्वाधिक संसर्ग होता. तेव्हापासूनच महाराष्ट्राचे आकडे वाढत आहेत.
भारतात कोरोनाव्हायरस बाधितांची संख्या लाखाच्या घरात पोहोचण्याच्या बेतात आहे. जगात ही देश अकराव्या स्थानी पोहोचला आहे.
या जागतिक आकडेवारीत भारत अकरावा असला, तरी भारताच्या लोकसंख्येच्या मानाने कमी लोकांना लागण झाली आहे आणि भारतात कोरोनाचा मृत्युदरही जगाच्या तुलनेत कमी आहे.
लॉकडाऊन 4.0 हा वेगळा आहे आणि बरेच उद्योग आता सुरू होणार आहेत, तरी पहिल्या 3 देशव्यापी लॉकडाऊनमुळे देशात कोरोनाचा संसर्ग कमी वेगाने पसरला हे स्पष्ट आहे.
भारतात दर दशलक्ष लोकसंख्येत 70 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि दहा लाखांतले दोन जण कोरोनाने मरत आहेत. हा आकडा जगाच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. हे वरच्या ग्राफिक्सवरून दिसेल.
जगात सर्वाधिक कोरोनाबळी अमेरिकेत गेले आहेत. याच देशात सर्वाधिक लोकसंख्येला संसर्ग झाला आहे. त्यानंतर रशियाचा क्रमांक लागतो. पण कोरोनाबळींमध्ये दुसरा क्रमांक स्पेनचा आहे.
आपल्या देशाचा विचार केला, तर देशव्यापी आकडे दिलासादायक असले तर महाराष्ट्रात कोरोनाचा कहर झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनारुग्ण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुजरातपेक्षा महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची सं सर्वाधिक कोरोनाबळी महाराष्ट्रात गेले आहेत.
कोरोनाचा लॉकडाऊन महाराष्ट्रात सुरू असला, तरी देशभर दिसला, तो फायदा महाराष्ट्रात दिसला नाही. राज्यातले व्यवहार बंद असूनही कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली.