मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या शाळेत मुलांना बोलावून पुस्तकं वाटप करण्यात आली आहे. (छाया- विनय म्हात्रे, पनवेल)
पनवेल महापालिका शाळा क्र. 2 हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन शिक्षण विद्यामंदीर शाळेतील प्रकार.
शाळा सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसतानाही पुस्तक वाटपासाठी शाळेने बोलावलं.
पनवेलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना यासोबत लॉकडाऊन असताना देखील शाळेने बोलावणं धाडल्याने आश्चर्य.
मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांनी शाळेत गर्दी केल्यानं सोशल डिस्टंसिंगचा उडाला फज्जा.
अशा गर्दीमुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यानं पालकांनी व्यक्त केली नाराजी.
पनवेलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना यासोबत लॉकडाऊन असताना देखील शाळेने बोलावणं धाडल्याने आश्चर्य.
शाळा सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसतानाही पुस्तकं घेण्यासाठी शाळेने बोलावलं.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यानं पालकांनी व्यक्त केली नाराजी.
मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांनी शाळेत गर्दी केल्यानं सोशल डिस्टंसिंगचा उडाला फज्जा.