NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र /  Weather Update Today : अजून किती दिवस उकाडा? चेक करा मुंबईसह 6 शहरांचं तापमान

 Weather Update Today : अजून किती दिवस उकाडा? चेक करा मुंबईसह 6 शहरांचं तापमान

उष्णतेचा पारा कमी होताना दिसत नाही आहे. आज तापमान किती असेल इथं चेक करा.

  • -MIN READ

    Last Updated: June 20, 2023, 06:23 IST
17

महाराष्ट्रात उष्णतेचा पारा कमी होताना दिसत नाही आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण आहेत.

27

नागपुरात काल 19 जून रोजी कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. आज 20 जून रोजी नागपुरातील वातावरण कोरडे असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. आज नागपूर जिल्ह्यात कुठलीही धोक्याची सूचना नसल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

37

कोल्हापुरात आज 20 जून रोजी दिवसभर सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापुरात काल 19 जून रोजी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर आज 20 जून रोजी देखील सारखेच म्हणजे कमाल तापमान 32 अंश आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

47

मुंबईत काल 19 जून रोजी कमाल 34 अंश सेल्सिअस तर किमान 29 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज 20 जून रोजी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस असणार आहे.

57

छत्रपती संभाजीनगरमध्ये काल 19 जून रोजी किमान 23 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते आणि कमाल तापमान हे 36 अंश सेल्सिअस होते. आज 20 जून किमान तापमान हे 23 अंश सेल्सिअस एवढे असेल आणि कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस एवढे असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

67

कल्याण डोंबिवलीत उन्ह आणि घामानं नागरिक हैराण आहेत. काल 19 जून रोजी कल्याण - डोंबिवलीत कमाल तापमान 35 होते तर किमान तापमान 28 होते. तर आज 20 जून रोजी कमाल तापमान 35 तर किमान तापमान 29 राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

77

पुण्यामध्ये काल 19 जून रोजी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. आज 20 जून रोजी शहरातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस असेल तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून तूरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल.

  • FIRST PUBLISHED :