बीड शहरात शिवजन्मोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
शिवजयंतीनिमित्त बीडमध्ये विदेशी कलाकारांच्या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मल्टीपर्पज ग्राउंड मध्ये हे अनोखे परफॉर्मन्स झाले.
या कार्यक्रमात विदेशी कलाकारांनी आपली कला सादर केली.
युक्रेन, रशिया, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि हंगेरी या पाच देशातील कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या पाचही देशांतील कलाकरांचा फायरो फायर आर्ट परफॉर्मन्स लक्षवेधी ठरला.
कार्यक्रमातील फायर विल डान्स हा रोमांचकारी होता.
बीडमध्ये पहिल्यांदाच परदेशातील कलाकारांचा चित्तथरारक परफॉर्मन्स झाला.
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
चित्तथरारक नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी बीडकरांनी संध्याकाळच्या सुमारास गर्दी केली होती.