आंबेजोगाई-केज-मांजरसुंबा-पाटोदा या सिमेंटच्या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी भेगा पडल्याने अपघाताला निमंत्रण दिले जात आहे.
आज पुन्हा दुपारी 2.30 ते 3 च्या दरम्यान नेकनुर जवळ भिषण अपघात झाला असुन त्यामध्ये बाप लेकाचा जागीच मृत्यु झाला आहे.
नारेवाडी येथील विनायक दादाहरी चौरे आणि विनोद विनायक चौरे हे दोघे बापलेक बीडवरून गावाकडे निघाले होते.
दरम्यान, नेकनूरपासूनपासुन काही अंतरावर तळ्याजवळ चारचाकी विस्टा गाडीचा व हॉन्डा शाईन गाडीचा भिषण अपघात झाला.
यात बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नेकनुर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे, सदरील अपघात नेमका कसा झाला हे स्पष्ट झालेले नाही.