NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / तुमच्याकडे असेल 1 एकर शेती, तर लावा ही 2 हजार झाडं, नंतर कमाईच कमाई PHOTOS

तुमच्याकडे असेल 1 एकर शेती, तर लावा ही 2 हजार झाडं, नंतर कमाईच कमाई PHOTOS

कोरडवाहू शेतकऱ्यांना कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणाऱ्या पेरूच्या शेतीचा चांगला पर्याय उपलब्ध आहे.

  • -MIN READ

    Last Updated: July 26, 2023, 08:25 IST
110

कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर अनेकदा कुठल्या पिकाची लागवड करावी असा प्रश्न असतो. पाण्याची कमतरता असल्यामुळे जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड ते करू शकत नाहीत. मात्र कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या फळझाडांची शेती आज अनेक शेतकरी करताना दिसतात.

210

यातच पेरूची शेती करणे देखील अगदी सोपे असून कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन हवे आहे तर तुम्हीही पेरूची लागवड करू शकता. याबाबत बीडमधीलकृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी दिली आहे.

310

सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा फळबागांच्या शेतीकडे कल वाढत आहे. आंबाड, चिकू, मोसंबी, डाळिंब, यासह विविध फळांची शेती करणारे शेतकरी आपल्याला दिसून येतात. ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांना फळ शेती करायची असते मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांनी केलेली फळ शेतीतून त्यांना अनेकदा नुकसान होते. त्यासाठीच कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणारी पेरूची शेती कशी करावी? याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

410

पेरूची लागवड नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना वगळता वर्षातील दहा महिने कधीही करू शकता. जमिनीची आखणी करून 6×6 मी अंतरावर 60×60×60 सेमी आकाराचे खड्डे घ्यावेत. हे खड्डे भरताना 15 ते 20 किलो चांगले कुजलेले शेणखत 500 ग्राम, सिंगल सुपर फॉस्फेट 5 ग्राम, फोलिडोल पावडर आणि माती यांच्या मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत आणि त्यात रोपांची लागवड करावी. जवळपास 1 एकर मध्ये 2 हजार झाडांची लागवड देखील होते.

510

पेरू बागेसाठी उष्ण आणि कोरडे हवामान अनुकूल मानले जाते. त्याच्या आदर्श उत्पादनासाठी 15 ते 30 सेल्सिअस तापमान योग्य मानले जाते. पेरूचे झाड कोरडे हवामान सहज सहन करते. पेरूचे रोप अगदी सहज तयार करता येते आणि हवामानातील चढ - उतारांचा त्यावर फारसा परिणाम होत नाही. ज्या ठिकाणी पाण्याची अत्यंत कमतरता आहे त्या ठिकाणी देखील हे पेरूचे पीक व्यवस्थित येते.

610

लखनऊ 49 - पेरूची संपूर्ण भारतात उत्पादित होणारी ही एक प्रगत आणि सुधारित जात आहे. या जातीचे झाडे आकाराने लहान असतात. या जातीचा पेरू मात्र खूपच गोड असतो. साहजिकच बाजारात याला मोठी मागणी आहे. या जातीच्या एका पेरूच्या झाडापासून जवळपास 155 किलो पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा केला जातो.

710

पिंक तैवाण पेरू -बाजारात सध्या ग्राहकांची आणि व्यापारी वर्गाची जास्तीत जास्त मागणी असलेला पेरू म्हणजे पिंक तैवान पेरू. साधारणपणे या पेरुचे वजन 500 ग्राम असते. हा पेरू आकाराने मोठा असतो. या पेरुचे वैशिष्ट्य म्हणजे आत मधून हा फिकट गुलाबी रंगाचा असतो जो चवीला एकदम गोड आणि रुचकर असतो.

810

लाल पेरू - या जातीच्या आकाराची फळे मध्यम आकाराची असतात. उत्तर कोकण आणि मुंबईच्या भागात ही पेरूची जात आढळते. या जातीच्या फळाचा गर कडक असतो.

910

पेरूवरील कीड, रोग नियंत्रण- शेंड अळीच्या नियंत्रणासाठी दोन मिली क्‍लोरपारिफॉस प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1010

देवी रोग नियंत्रण : ढगाळ वातावरणात देवी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. नियंत्रणासाठी बोर्डोमिश्रण (0.6 टक्के) फवारणी करावी. यासाठी 100 लिटर पाण्यात 600 ग्रॅम मोरचूद मिसळावे. त्याचा सामू सातपर्यंत करण्यासाठी 350 ग्रॅम कळीचा चुना मिसळावा. त्यानंतर आठ दिवसांनी स्ट्रेप्टोसायक्‍लीन 25 ग्रॅम आणि कॅपटाफ 250 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

  • FIRST PUBLISHED :