NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Success Story : पपईच्या शेतीनं वर्षभरात बदललं चित्र, शेतकरी झाला लखपती! Photos

Success Story : पपईच्या शेतीनं वर्षभरात बदललं चित्र, शेतकरी झाला लखपती! Photos

Success Story : जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव या गावातील नासेर शेख हे शेतकरी पपई लागवडीतून लखपती झाले आहेत.

18

जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव या गावातील नासेर शेख हे शेतकरी पपई लागवडीतून लखपती झाले आहेत.

28

नासेर शेख यांना 15 एकर जमीन असून, पारंपरिक पिकाचे उत्पादन व त्यासाठी येणारा उत्पादन खर्च यांचा अनेक दिवस ताळमेळ बसत नव्हता.

38

त्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये दोन एकर जमिनीवर 8 बाय 6 अंतरावर 2 हजार पपई रोपाची लागवड केली.

48

पाणी व्यवस्थापन, अंतरमशागत, विविध प्रकारचे रोग पिके नियंत्रण, खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन या सर्व बाबी नियोजनबद्ध पद्धतीने केल्या

58

एकूण शेती मशागतीसाठी त्यांना 1 लाख रुपये खर्च आला. लागवडीच्या केवळ 9 महिन्यांच्या कालावधीनंतर पपईची फळे तोडणीसाठी परिपक्व झाली.

68

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये व्यापाऱ्यांनी फळ खरेदी केली. 2 फेब्रुवारीपर्यंत 32 टन मालाची विक्री झाली आहे.

78

नासेर शेख यांच्या शेतात अद्याप 35 टनांपर्यंत माल असून तीन महिन्यांपर्यंत त्याची टप्प्याटप्याने विक्री होणार आहे

88

आतापर्यंत 4 लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले असून यापुढे 3 लाख रुपये उत्पादन होईल अशी त्यांची अपेक्षा आहे.

  • FIRST PUBLISHED :