औरंगाबाद, 11 ऑगस्ट: बहीण भावाच्या नात्यासाठी रक्षाबंधन हा सण महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळपासूनच राखी बांधण्याला सुरुवात झाली आहे औरंगाबाद शहरांमध्ये कुटुंबात तसेच पोलीस ठाण्यामध्ये होस्टेल शाळा महाविद्यालय यासह विविध ठिकाणी राखी बांधायला सुरुवात झाली आहे. रक्षाबंधन निमित्त औरंगाबाद शहरातील विविध भागातील टिपलेले काही फोटो पाहूया
बीड बायपास परिसरामध्ये असलेल्या वडार वस्तीमध्ये पहाटेच उठून आंघोळ करून भावासाठी तयार केले. बहिणीने भावाला राखी बांधत रक्षाबंधन साजरा केला
रक्षाबंधनाच्या दिवशी लहान बहिणी चांगल्याच उत्साहात असतात. या चिमुकलीनं तर चक्क वडिलांना राखी बांधून आजचा सण साजरा केला.
गांधी भवन परिसरात असलेल्या प्रोग्रेस फाउंडेशनच्या वतीने लहान मुलांनी या राख्या घेऊन फाउंडेशनच्या महिलांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांना राखी बांधली.
शहरातील काही महिलांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बागुल यांना राखी बांधली. यावेळी समाजाचे रक्षण करण्याच आश्वासन बागूल यांनी त्यांच्या बहिणींना दिलं.
बहीण भावाच्या नात्यातील प्रेमाचा संस्कार असलेलं रक्षाबंधन या दोन चिमुकल्यांनी पहिल्यांदाच साजरं केलं. यावेळी या छोट्या बहिणीनं अगदी आनंदानं भावाला राखी बांधली