NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / 'अन्न द्या, नाहीतर गावी जाऊ द्या'; मोदींच्या लॉकडाऊन वाढवण्याच्या घोषणेनंतरचे ठाण्यातले हे फोटो अस्वस्थ करतील

'अन्न द्या, नाहीतर गावी जाऊ द्या'; मोदींच्या लॉकडाऊन वाढवण्याच्या घोषणेनंतरचे ठाण्यातले हे फोटो अस्वस्थ करतील

लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केल्यानंतर घरी जायला मिळण्याच्या आशेवर जगणाऱ्या परप्रांतीय मजुरांनी किती अगतिकपणे मागणी केली ते या फोटोतून जाणवेल. जमावबंदी आणि कोरोनाची भीती झुगारून हजारभर कामगार ठाण्यात असे रस्त्यावर उतरले होते.

16

मोदींनी LOCKDOWN 2 ची घोषणा केल्यानंतरची ही गर्दी. सोशल डिस्टन्सिंग, जमावबंदी असे सगळे नियम पायदळी तुडवत ही एवढी गर्दी उसळली ठाण्याजवळच्या मुंब्र्यामध्ये.

26

14 एप्रिलला सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन किमान 3 मे पर्यंत वाढवल्याची घोषणा केली.

36

मोदींच्या या घोषणेनंतर उतावीळ झालेले परप्रांतीय कामगार, बेघर मजूर रस्त्यावर उतरले. आम्हाला गावी जाऊ द्या, अशी त्यांची मागणी होती.

46

ठाण्याजवळ मुंब्रा इथे हे मजूर वेगवेगळ्या वसाहतींमध्ये आणि मिळेत त्या जागी राहात आहेत. काम नसल्यामुळे उपासमार होते आहे.

56

जमावबंदीचे आदेश झुगारून रस्त्यावर उतरलेले श्रमिक पाहून पोलिसांची फौज तैनात झाली.

66

मुंब्रा नाका इथे कामगार आणि परराज्यातील मजुरांनी रस्त्यावर उतरुन गोंधळ घातला. त्यांना इथे रहायचे नसून आपल्या गावी परत पाठवा असा आरडा ओरडा हे कामगार करु लागले.

  • FIRST PUBLISHED :