अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव गुप्ता येथील दावल मलिक बाबा हिंदू-मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान आहे.
पाच पीर बाबा म्हणून ओळखला जाणारा हा दर्गाह हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मानले जाते.
वडगाव गुप्ता येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा पीर आहे. दावल मलिक बाब यांच्या उरूसाला अनेक वर्षांची परंपरा आहे.
नुकतेच 15 व 16 मार्चला यंदाचा उरूस संपन्न झाला. गावातील दरवर्षी होणाऱ्या उरुसासाठी पै-पाहुणे गोळा होतात.
यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री संदल मिरवणूक काढण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी छबिना मिरवणूक काढण्यात आली.
मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. लोकनाट्य तमाशा तसेच कुस्त्यांचे जंगी मैदानही होते.
यंदा यात्रेनिमित्त संपूर्ण मंदिरावर व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला.
यात्रेमध्ये लहान मुलांची खेळणी, विविध प्रकारचे करमणूक करणारे प्रकार, मोठे रहाट पाळणे आले होते.
या यात्रेमध्ये काही स्टॉल लक्षवेधी होते. घरगुती वापराच्या वस्तूंची दुकानेही आली होती.
उरुसात लागलेल्या सौंदर्य प्रसाधनांच्या स्टॉल भोवती महिला, मुलांनी गर्दी केली होती.
दरवर्षी यात्रेमध्ये खाद्यपदार्थांची दुकाने येतात. यंदाही विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले होते.
यात्रेनिमित्त गावात येणार्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली.
सुरक्षेच्या दृष्टीने गावात व यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.