NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Ahmednagar News : एक चूक अन् दीड वर्षांच्या चिमुरडीसह कुटुंब संपले, मन हेलावून टाकणारे अपघात PHOTOS

Ahmednagar News : एक चूक अन् दीड वर्षांच्या चिमुरडीसह कुटुंब संपले, मन हेलावून टाकणारे अपघात PHOTOS

अहमदनगर जिल्ह्यामध्येही अपघाताचं प्रमाण वाढलेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या महिनाभरातील काही अपघातावर एक नजर टाकूया.

  • -MIN READ

    Last Updated: July 03, 2023, 19:30 IST
17

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्येही अपघाताचं प्रमाण वाढलेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या महिनाभरातील काही अपघातावर एक नजर टाकूया.

27

2 जूनला अहमदनगर-कल्याण महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ भीषण अपघात झाला होता. आयशर टेम्पो आणि दोन कारचा हा अपघात झाला होता. तीन वाहनांचा या विचित्र अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला होता, तर 6 जण जखमी झाले होते.

37

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला होता. आंबीखालसा फाटा परीसरात ही दुर्घटना शनिवार 3 जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान घडली होती. ट्रक (क्रमांक आरजे- 14, जीके 2050) हा पुण्याकडून नाशिकच्या दिशेने चालला होता. शनिवारी रात्री तो साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान आंबीखालसा फाटा परिसरात आला असता, त्याच दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने आलेली कार (एमएच 17, एसी 197) वरील चालक आनंद सुनील भाटेवरा यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. यात आनंद सुनील भाटेवरा (वय 23, रा. कोल्हार तालुका, राहाता) यांचा मृत्यू झाला होता.

47

अहमदनगरमध्ये 3 जूनला कारच्या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर चौघे जण जखमी झाल्याची घटना घडली होती. काजवा महोत्सव पाहून घरी परत येत असताना हा अपघात झाला होता. अहमदनगरच्या अकोले तालुक्यात ही घटना घडली होती. तालुक्यातील नवलेवाडी शिवारात कोल्हार - घोटी राज्यमहामार्गावर कारला अपघात झाला होता. पुण्यामधील एक कुटुंब अहमदनगर येथे काजवा महोत्सव पाहण्यासाठी आले होते. हा महोत्सव पाहून परत येत असताना ही घटना घडली होती. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले होते.

57

अहमदनगर - छञपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा तालुक्यातील वडाळा (बहिरोबा) जवळ कार आणि आयशर टेम्पोची धडक होवून झालेल्या भीषण अपघात 4 जण ठार झाले तर 1 महिला जखमी झाली होती. रविवार 11 जून रोजी सकाळी साडे नऊ-दहा वाजेच्या सुमारास अहमदनगर कडून छञपती संभाजीनगरच्या दिशेने जात असलेल्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर कार क्रमांक (एम एच 14.एस सी.9007) धडकून समोरून येणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक (एम एच 48 टी 5319) ला जोरदार धडक बसल्याने सदर अपघात झाला होता.

67

अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इमामपूर शिवारात रविवारी 18 जूनला उभ्या कंटेनरला भरधाव कंटेनरची धडक बसून चालक जागीच ठार झाला होता. इमामपूर शिवारात भैरवनाथ मळा येथे रविवारी सकाळी सहा वाजता हा अपघात झाला होता. त्यात या कंटेनरच्या केबिन पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने चालक संतोष किसन पिसाळ (वय 45, रा. चोराडे, म्हासुरणे, जि. सातारा) यांचा मृत्यू झाला होता.

77

30 जूनला अहमदरनगराच्या शिर्डी जवळील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात शुक्रवारी रात्री एक वाजताच्या सुमारास क्रुझरने आयशरला भीषण धडक दिली होती. या अपघातात एका दाम्पत्यासह त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. तर, नवविवाहित जोडप्यासह 3 जण जखमी झाले होते. संतोष राठोड (वय,35) त्यांची पत्नी वर्षा राठोड (वय. 29 आणि मुलगी अवनी संतोष राठोड (वय, दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

  • FIRST PUBLISHED :