कठड्याला धडक बसल्याने ट्रक उलटून मोठा अपघात झाला आहे.
पंढरपूर कराड मार्गावर कोर्टी गावाजवळ असलेल्या उजनी कालव्याजवळ धक्कादायक घटना समोर आली आहे.
ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे चालकाने सांगितले आहे
मध्यरात्री साडेबारा वाजता हा भीषण अपघात झाला ट्रक मध्ये सिमेंट पोती होती.
ट्रक रस्त्यात आडवा पडल्याने रात्रीपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. सिमेंट पोती दुसऱ्या वाहनात भरुन ट्रक बाजूला काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.