पालघरमध्ये अपघात घडल्याचं समोर येत आहे. या अपघातात दोन चिमुकल्या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला.
पालघरमध्ये मोडगाव येथे हा अपघातात घडला आहे. रस्त्याने चालत असलेल्या दोन्ही भाऊ बहिणीला भरधाव पिकअपने चिरडलं.
उधवा मोडगाव धुंदलवाडी रस्त्यावर हा भीषण अपघात घडला.
प्रीती मालकरी आणि शाहिद मालकरी या भावंडांचा या अपघातात जीव गेला.
अपघातानंतर पिकप चालक पिकअप घेऊन फरार झाल्याचं समोर येत आहे. हे चिमुकले पालघरचे आमदार श्रीनिवास वणगा यांच्या जवळचे नातेवाईक असल्याचं समोर आलंय.