NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / मृत व्यक्तीच्या दात, केसांपासून ज्वेलरी; तरुणीला आगळेवेगळे दागिने बनवण्याची आवड

मृत व्यक्तीच्या दात, केसांपासून ज्वेलरी; तरुणीला आगळेवेगळे दागिने बनवण्याची आवड

कोण काय करेल, कोणाला काय आवडेल याचा काही नेम नाही, हे बोलतात ते खरंच आहे. एखाद्याची आवडचं त्याचं कामही ठरतं. असाच काहीसा प्रकार एका 29 वर्षीय तरुणीचा आहे. जॅकी विलियम्स ग्रेव मेटलम ज्वेलर्सची मालक आहे. ती मेलेल्या लोकांच्या दातापासून अंगठ्या, बांगड्या आणि नेकलेस बनवून त्याची विक्री करते. (Image: Jacqui Williams / SWNS)

17

अनेकांना दागिन्यांची आवड असते. महिलांसह पुरुषांनाही दागिने आवडतात. काही लोकांना डायमंड, काहींना गोल्ड तर काहींना आणखी काही आवडतं. परंतु ऑस्ट्रेलियात एक तरुणी मृत लोकांच्या दातापासून ज्वेलरी तयार करुन त्याची विक्री करते. ही तरुणी तिच्या या गोष्टीमुळे इंटरनेटवर तुफान चर्चेत आहे. हीच तिची आवड असल्याचं त्या तरुणीचं म्हणणं आहे.

27

जॅकी विलियम्स ग्रेव मेटलम ज्वेलर्सची मालक आहे. ती मृत लोकांच्या दातापासून अंगठ्या, बांगड्या आणि नेकलेस बनवून त्याची विक्री करते. काही दागिन्यांमध्ये मानवी अवशेष केस, राखही सामिल असते.

37

जॅकी पूर्वी एका स्थानिक कब्रस्तानात माळी म्हणून काम करत होती. अशाप्रकारे मृत व्यक्तीच्या दातापासून दागिने बनवण्याची कल्पना कोणी करू शकणार नाही. परंतु तिचं असं ठाम म्हणणं आहे, की असे दागिने त्या मृत व्यक्तीच्या प्रियजनांना त्या दु:खातून बाहेर येण्यास मदत करू शकतात.

47

जॅकी ग्राहकांच्या परवानगीनेच त्यांच्या कुटुंबातील मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या दातांपासून दागिने बनवते. असं स्पेशल ऑर्डर आल्यावरच केलं जातं.

57

'मी लोकांना त्याच्या दु:खातून, झालेल्या नुकसानापासून बाहेर काढण्यास मदत करू इच्छिते. ही गोष्ट अशी आहे, जी प्रत्येक मागे राहिलेल्या प्रियजनांना सुखच देईल', असं जॅकी म्हणते.

67

प्रत्येक कस्टम पीस बनवण्यासाठी तिला सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागतो. प्रत्येक दागिन्यासाठी ती 350 डॉलर ते 10 हजार डॉलरपर्यंत चार्ज करते. ग्राहकांनाच या दागिन्यांसाठी मेटल द्यावं लागतं.

77

जॅकीने 2017 पर्यंत मेलबर्न पॉलिटेक्निक ज्वेलरी आणि ऑब्जेक्ट डिझाईनमध्ये डिप्लोमा केला आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तिने या क्षेत्रात नोकरीही केली. त्यानंतर हा व्यवसाय सुरू केला.

  • FIRST PUBLISHED :