NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / तिनं होय म्हणण्यासाठी अगोदर तिच्या या डॉग्सना पटवावं लागतं; तेच सिलेक्ट करतात Boyfriend

तिनं होय म्हणण्यासाठी अगोदर तिच्या या डॉग्सना पटवावं लागतं; तेच सिलेक्ट करतात Boyfriend

जेहानेली रँडल नावाच्या महिलेकडे ही दोन कुत्री आहेत, ज्यांना ती स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम करते. कुत्र्यांशी तिचं इतकं घट्ट नातं आहे की, ती तिच्या प्रियकराची निवड स्वतःच्या इच्छेपेक्षा कुत्र्यांच्या इच्छेनुसार करते.

16

व्यवसायाने विनोदी कलाकार (कॉमेडियन) असलेली 34 वर्षीय जेहानेली रँडलला हिच्याकडे (Jahnnalee Randall) जिझ्मो आणि स्टारलिना नावाचे दोन कुत्रे आहेत. जेहानेली त्यांना नेहमी सोबत ठेवत असते. तिच्या शोमध्येही ती त्यांना सोबत घेते आणि तिच्या इच्छेची विशेष काळजी घेते.

26

जेहानेली या कुत्र्यांसोबत इतकी खूश आहे की, ती कधीही कोणाच्या प्रेमसंबंधांमध्ये फारशी राहिलेली नाही. मिररच्या रिपोर्टनुसार, ती डेटींगवर जास्त विश्वास ठेवत नाही आणि एकटी राहणे पसंत करते. ती स्पष्टपणे सांगते की, तिला एखाद्याला भेटायचे असेल तर कुत्र्यांनी तिला परवानगी देणं आवश्यक असतं.

36

ती सांगते की, तिचे कुत्रे इतके हुशार आहेत की ते सर्वकाही बरोबर निवडू शकतात आणि तिला कुत्र्यांच्या निवडीवर विश्वास आहे. तिचा 12 वर्षांचा कुत्रा जिझ्मोला एखादा माणूस आवडत नसेल तर ती त्याला डेट करत नाही. जेहानेलीच्या मते, कुत्रे निष्ठावान, स्पेशल आणि प्रेमळ असतात.

46

विशेष म्हणजे जेहानेली माणसांना कुत्र्यांपेक्षा वाईट मानते. ती म्हणते की तिला माणसंही फारशी आवडत नाहीत. इतकेच नाही तर तिला लहान मुलांपेक्षा कुत्रे जास्त आवडतात. तिला मुलांपेक्षा केसाळ कुत्री जास्त आवडतात. जेहानेलीला त्यांच्यासोबत राहणे आणि त्यांची देखभाल करणे आवडते.

56

तिचा कुत्र्यांवर होणारा खर्चही तितकाच मोठा आहे. तिच्याकडे 40,000 डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 30 लाख 50 हजार रुपयांचा वॉर्डरोब आहे, ज्यामध्ये विविध प्रकारचे कपडे आणि अॅक्सेसरीज आहेत. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील जेहानेलीला कुत्र्यांसाठी खरेदी करणे आणि त्यांना कपडे घालणे आवडते.

66

या स्पेशल आणि लाडक्या कुत्र्यांचे स्वतःचे बेडरूम देखील आहे. ज्यामध्ये डबल बेड आहे. जेहानेलीच्या घरी स्वतःचे डॉग थीम पार्क आहे, ज्यामध्ये वॉटर स्लाइड्स, बीनबॅग, इंद्रधनुष्य आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. त्यांच्यासाठी एक स्ट्रॉलर देखील आहे, ज्यामध्ये कुत्रे फिरायला जातात आणि नेहमी त्यांच्या मालकिनीभोवती राहतात. (सर्व फोटो क्रेडिट- Instagram/@ jahnnalee)

  • FIRST PUBLISHED :