NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / बुलेट सोडणारी इअररिंग ते करंट देणारी सँडल; महिलांशी पंगा घेणं पडेल भारी

बुलेट सोडणारी इअररिंग ते करंट देणारी सँडल; महिलांशी पंगा घेणं पडेल भारी

महिलांच्या सुरक्षेसाठी झुमक्यांपासून ते सँडलपर्यंत सर्वकाही हायटेक.

18

महिलांवरील अत्याच्याराच्या कितीतरी घटना समोर येत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा विचार करता त्यांच्या नेहमी सोबत असलेल्या किंवा त्या वापरत असलेल्या वस्तूंनाच हायटेक बनवण्यात आलं आहे.

28

आता ही चप्पल पाहा. तशी पाहिली तर ही डिझाइनर चप्पल. पण ही साधीसुधी चप्पल नाही तर खास धुलाईसाठीच बनवण्यात आली आहे असं म्हणायला हरकत नाही.

38

यूपीच्या मेरठमधील एका इनोव्हेटरने ही चप्पल तयार केली आहे. ज्यावर बटण आहे. हे बटण दाबत ज्या व्यक्तीला ही चप्पल मारली जाईल त्या व्यक्तीला करंट बसेल.

48

महिला कुठे बाहेर गेल्या की त्यांच्याकडे एक पर्स असते. अशीच एक पर्स तयार करण्यात आली आहे. ज्यातून बंदुकीच्या गोळीचा आवाज येतो.

58

या पर्सला तुम्हाला एक नळी दिसेल. या नळीतून बंदुकीची गोळी सुटावी तसा आवाज येतो. यामुळे समोरची व्यक्ती घाबरून पळालीच समजा.

68

दागिने म्हणजे कित्येक महिलांच्या जिव्हाळ्याची वस्तू. अशाच दागिन्यांमध्ये जीपीएस बसवण्यात आलं आहे. जेणेकरून दागिने चोरीला गेले तर त्यांची माहिती मिळेल.

78

याआधीही महिलांसाठी स्मार्ट झुमके तयार करण्यात आले होते. असे इअरिंग ज्यातून मिरची बुलेट बाहेर पडते. 

88

या झुमक्यातून मिरची पूडची बुलेट निघते. तसंच पोलिसांपर्यंत अलर्टही पोहोचवण्यास हे झुमके मदत करतात.

  • FIRST PUBLISHED :