NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / गर्भावस्थेत नको ब्युटीपार्लरमध्ये जाण्याचा त्रास; घरच्या घरीच घ्या त्वचेची काळजी

गर्भावस्थेत नको ब्युटीपार्लरमध्ये जाण्याचा त्रास; घरच्या घरीच घ्या त्वचेची काळजी

प्रिग्नेन्सीत (During Pregnancy) त्वचा खराब झाली असेल तर, फेशियल,ब्लीच करण्याआधी ही माहिती वाचा

110

गर्भावस्थेच्या काळामध्ये संपूर्ण शरीरावर परिणाम झालेला असतो. महिलांना या काळामध्ये अनेक आरोग्यविषयक समस्या होत असतात. याशिवाय केस गळणं, चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डाग येणं यासारखे त्रास व्हायला लागतात. अशा वेळेस एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल किंवा अगदी बेबी शॉवर असेल तर, सुंदर दिसण्यासाठी महिलांना फेशियल किंवा करण्याची इच्छा होते.

210

मात्र ब्युटीपार्लरमध्ये जाऊन फेशियल किंवा ब्लीच करणं किती योग्य आहे अशी शंका मनामध्ये येत राहते तर,जाणून घेऊयात प्रेग्नेंसीच्या काळामध्ये फेशियल किंवा ब्लीच करणं किती सुरक्षित आहे.

310

एखादा स्किन प्रॉब्लेम असेल तर ब्युटीशियन आपल्याला फेशियल किंवा ब्लीच करण्याचा सल्ला देतात. मात्र फेशियल किंवा ब्लीचसाठी वापरल्या जाणाऱ्या क्रिम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. हे केमिकल्स बाळ आणि आई दोघांचाही आरोग्यासाठी घातक असतात.

410

तरीही जर ब्युटीपार्लरमध्ये जायची इच्छा असेल तर, एखाद्या स्वच्छतेकडे लक्ष देणाऱ्या ब्युटी पार्लरमध्ये जा आणि केमिकल फ्री फेशियल करा. मात्र गर्भवती महिलांनी ब्लिच मुळीच करू नये.

510

प्रेग्नेंसीच्या काळामध्ये महिलांच्या शरीरामध्ये हार्मोनल बदल होत असतात. अशा काळात महिलांची त्वचा सेन्सिटिव्ह झालेली असते. या वेळी केमिकलयुक्त फेशियल किंवा ब्लीच केल्यामुळे चेहऱ्यावर आलर्जी रॅशेस किंवा पिंपल्स होऊ शकतात.

610

काही क्रिममध्ये जास्त प्रमाणात केमिकल्स वापरलेले असतात. याच्या वासामुळे महिलांना उलटी होण्याचा त्रास होऊ शकतो.

710

काही महिलांना केमिकलयुक्त क्रिम्समुळे श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ शकतो. हे केमिकल्स रोमछिद्रांमधून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्याचा बाळ आणि आईवर वाईट परिणाम होऊ शकतो.

810

ब्लिच करताना वापरल्या जाणाऱ्या फेशियल क्रिममुळे, ब्लिचमध्ये वापरल्या जाणाऱ्या ॲक्टिवेटरमुळे स्किनवर खाज येणं किंवा रॅशेस येणं असे त्रास होऊ शकतात.

910

प्रेग्नेंसीच्या काळामध्ये फेशियल करायचं असेल तर, घरच्या घरी होम रेमेडीज वापरून करता येऊ शकतं. याकरता टोमॅटो संत्र्याचा रस केळं अशी फळ वापरता येऊ शकतात. याशिवाय बेसन,हळद,गुलाब पाणी टाकून त्याचा फेसपॅक देखील चेहऱ्यावर लावता येऊ शकतो.

1010

कोरफड जेल लावणं फायदेशीर असतं. उन्हाचा त्रास होत असेल तर, चेहऱ्यावर चंदन आणि मुलतानी मातीचा फेस पॅक लावू शकता. गर्भावस्थेच्या काळामध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक वस्तूंचा वापर करावा.

  • FIRST PUBLISHED :